(रत्नागिरी)
तालुक्यातील नेवरे गावात आज गुरुवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिवाकर बाळकृष्ण सुर्वे (वय ७०, रा. भंडारपुळे मुळ, नेवरे, रत्नागिरी) यांचा मृतदेह घराच्या बाहेर आढळला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर सुर्वे हे मोलमजुरी करत होते आणि त्यांना मद्याचे व्यसन होते. नातेवाईक सुरेश एकनाथ सुर्वे यांनी घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिवाकर सुर्वे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

