(रत्नागिरी)
बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव व कोकण विभाग प्रभारी, बहुजन चळवळीतील जाज्वल्य कार्यकर्ते, न विकलेले स्वाभिमानी आणि लढवय्ये नेते दिवंगत राजेंद्र लहु आयरे यांचे आज दुपारी 1.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
विद्यार्थीदशेपासून कांशिरामजींच्या प्रेरणेतून आणि आंबेडकरी विचारधारेत घडलेले राजेंद्र आयरे हे बहुजन मिशनसाठी आयुष्यभर झटणारे खरे मिशनरी योद्धे होते. त्यांच्या निधनामुळे बहुजन समाज पक्षासह संपूर्ण बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार बुधवार, दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा अशोक नगर, परटवणे, रत्नागिरी येथून निघेल.

