(रत्नागिरी)
सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमध्ये आज (गुरुवारी, ता. २५) दुपारी सुमारे १ वाजता महेश रधुनाथ साळुंखे (वय ५५, रा. अशोकनगर, भांडूप-मुंबई) हे प्रवासादरम्यान बेशुद्ध अवस्थेत आढळले.
रेल्वे पोलिसांनी त्वरित रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्यांना दाखल केले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी सुमारे २.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

