(रत्नागिरी)
शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय प्रौढाने रागाच्या भरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्रदीप प्रकाश रजपूत (रा. दत्तमंदिरजवळ, गवळीवाडा, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या प्रदीप यांनी हॉलमधील लाकडी वाशाला फॅनच्या हुकाला घरातील वापरात असलेल्या नायलॉनच्या साडीचा गळफास घेतला.
नातेवाईक व शेजाऱ्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

