( रत्नागिरी / वार्ताहर )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या अंतर्गत कराटे असोसिएशन रत्नागिरी, तालुका व जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे २३० खेळाडूंनी सहभाग घेत आपले कराटे कौशल्य सादर केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रशांत सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. मेघा कुलकर्णी उपस्थित होत्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, क्रीडा अधिकारी श्री. गणेश जगताप, कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. जावेद मिरकर, सचिव श्री. सुरज बने, उपाध्यक्ष श्री. दीपक कदम, खजिनदार श्री. अरुण बेग, सदस्य सौ. नौशीन कापडी, गुहागर तालुका प्रशिक्षिका डॉ. योगिता खाडे, श्री. हुजेफा ठाकूर, लांजा तालुका प्रशिक्षक श्री. मंगेश हटकर, दापोली तालुका प्रशिक्षक श्री. सुरेंद्र शिंदे, ॲड. प्रकाश जाधव यांच्यासह विविध तालुक्यांतील क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वयोगटांमध्ये वजनगटनिहाय सामने घेण्यात आले. रत्नागिरी, खेड, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर, साखरपा, गुहागर आणि दापोली या भागांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रत्येक वजनगटातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
१४ वर्षांखालील मुले
२५ ते ३० किलो वजनगटात प्रथम अब्दुल मुब्दी धामस्कर, द्वितीय समर्थ विनीत गोताड, तर तृतीय क्रमांक अरहान जोहेब सोलकर व स्वयम् गणेश पवार यांनी मिळविला.
३० ते ३५ किलो गटात प्रथम स्वर संजय सुर्वे, द्वितीय चैतन्य व बांबडे, तर तृतीय अमीर युसुफ खान व अवधूत आंबेकर ठरले.
३५ ते ४० किलो गटात प्रथम इब्राहिम गावकडकर, द्वितीय मोहम्मद फणसोपकर, तर तृतीय आयान शेख व आर्य कुमार मर्चंट यांनी स्थान मिळविले.
४० ते ४५ किलो गटात प्रथम ओम शिर्के, द्वितीय रेहान मजगावकर, तर तृतीय हसनेन मुजावर व अंकुर कदम यांनी क्रमांक मिळविले.
४५ ते ५० किलो गटात प्रथम अथर्व कदम, द्वितीय अरहान मुकादम, तर तृतीय श्लोक भिंगार्डे व हुसेन डंबीर ठरले.
५० ते ५५ किलो गटात प्रथम वेदांत देवाडिगा, द्वितीय मयुरेश रजपूत, तर तृतीय काझीम शहा यांनी स्थान मिळविले.
५५ ते ६० किलो गटात प्रथम अर्णव जोगळेकर आणि द्वितीय अणस मेढवली ठरले.
६० किलोवरील गटात प्रथम विघ्नेश नलावडे, द्वितीय साईश शिरधनकार, तर तृतीय फराज बंदरकर व अद्वैत ढवळ यांनी क्रमांक मिळविले.
१४ वर्षांखालील मुली
२६ ते ३० किलो गटात प्रथम प्रियवंदा बोरवणकर, द्वितीय मीहिका गोताड, तर तृतीय सई पाटील ठरली.
३० ते ४० किलो गटात प्रथम रुंजी सुर्वे, द्वितीय ईश्वरी सावंत, तर तृतीय हया काझी व शुभ्रा माबदी यांनी स्थान मिळविले.
३४ ते ३८ किलो गटात प्रथम आराध्य कोकाटे, द्वितीय जोया बुडिये, तर तृतीय रिद्धी वळवी व सोना जाधव ठरल्या.
३८ ते ४२ किलो गटात प्रथम दुर्वा चव्हाण, द्वितीय तनया शितल, तर तृतीय लावण्या नलावडे हिने क्रमांक मिळविला.
४२ ते ४६ किलो गटात प्रथम आयशा मुल्ला, द्वितीय दिशा चौधरी, तर तृतीय अनुष्का झोरे व अहलाम काझी यांनी स्थान मिळविले.
४६ ते ५० किलो गटात प्रथम अमीना पाटणकर, द्वितीय किमया शिरधनकर, तर तृतीय विहा पावसकर ठरली.
५० किलोवरील गटात प्रथम शुभ्रा कडवेकर, द्वितीय समायरा काझी, तर तृतीय स्वरा चव्हाण व जैनब बोरकर यांनी क्रमांक मिळविले.
१७ वर्षांखालील मुले
३५ किलोखालील गटात प्रथम दुर्वांक बंडे ठरला.
३५ ते ४० किलो गटात प्रथम स्पर्श लिंगायत, द्वितीय अर्णव जोशी, तर तृतीय सुजल साळवी व ताहीब माहीमकर यांनी स्थान मिळविले.
४० ते ४५ किलो गटात प्रथम स्पंदन लिंगायत, द्वितीय प्रशांत शेंडे, तर तृतीय हमजा देवळेकर व शौर्य पवार ठरले.
४५ ते ५० किलो गटात प्रथम अथर्व मोरे, द्वितीय जावेद कोरबू, तर तृतीय ओम शेटे व सफल कलगड यांनी क्रमांक मिळविले.
५० ते ५४ किलो गटात प्रथम रुद्र खर्डे, द्वितीय रोमित घोसाळकर, तर तृतीय वेदांत सागवेकर व हर्ष शेलार ठरले.
५४ ते ५८ किलो गटात प्रथम ध्रुव बसणकर, द्वितीय रोहन चौधरी, तर तृतीय लीलाधर साठपे व आदित्य नारकर यांनी स्थान मिळविले.
५८ ते ६२ किलो गटात प्रथम ताहीर मंगा, द्वितीय मानस पाठवणे, तर तृतीय दुर्वांक राऊत व राजकुमार मिस्त्री ठरले.
६२ ते ६६ किलो गटात प्रथम अर्णव भाटकर याने क्रमांक मिळविला.
६६ ते ७० किलो गटात प्रथम मोहम्मद अली बरमारे, तर द्वितीय संग्राम तांबे ठरला.
७० ते ७४ किलो गटात प्रथम अनिकेत गोडे, तर द्वितीय ऊजर मस्तान याने स्थान मिळविले.
१७ वर्षांखालील मुली
३२ ते ३६ किलो गटात प्रथम गार्गी केळकर ठरली.
३६ ते ४० किलो गटात प्रथम करुणा जाधव, द्वितीय मनाली घाडीगावकर, तर तृतीय पूजा बागवे व तीर्थ माध्ये यांनी स्थान मिळविले.
४० ते ४४ किलो गटात प्रथम आयशा मस्तान, द्वितीय हेमांगी मेंढे, तर तृतीय उत्कर्ष पाटील व पूर्वी शिंदे ठरले.
४४ ते ४८ किलो गटात प्रथम प्राची सकपाळ, तर द्वितीय अनुष्का मुसळकर हिने क्रमांक मिळविला.
४८ ते ५२ किलो गटात प्रथम तनुजा बारस्कर, द्वितीय अक्षरा माने, तर तृतीय आर्या पवार व अध्यासा दास ठरल्या.
५२ ते ५६ किलो गटात प्रथम आराध्या चव्हाण, द्वितीय मधुरा पारकर, तर तृतीय सानिका पवार व अफ्रिन काद्री यांनी स्थान मिळविले.
५६ ते ६० किलो गटात प्रथम फातिमा बुडये, द्वितीय आर्या झोरे, तर तृतीय अनया चव्हाण ठरली.
६० ते ६४ किलो गटात प्रथम दुर्वा पवार हिने क्रमांक मिळविला.
६८ किलोवरील गटात प्रथम खुशी हटकर ठरली.
१९ वर्षांखालील मुले
५४ ते ५८ किलो गटात प्रथम महेश वाघमारे ठरला.
६२ ते ६८ किलो गटात प्रथम शुभम भंडारे, द्वितीय सम्राट महाडिक, तर तृतीय सार्थक हटकर यांनी स्थान मिळविले.
१९ वर्षांखालील मुली
३६ ते ४० किलो गटात प्रथम रिया माचकर ठरली.
४४ ते ४८ किलो गटात प्रथम मानवी कपाले हिने क्रमांक मिळविला.
४८ ते ५२ किलो गटात प्रथम संचिता हटकर ठरली.
५२ ते ५६ किलो गटात प्रथम सोम्या अंजार्लेकर हिने स्थान मिळविले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरीचे पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, स्वयंसेवक आणि पालक यांनी विशेष मेहनत घेतली. विजयी खेळाडूंचे संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि पालकवर्ग यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कराटेच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास, साहस आणि क्रीडाभावना विकसित करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली. जिल्ह्यातील शालेय खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले.


