वय जसजसं वाढतं, तसतसं शरीर अनेक आजारांच्या विळख्यात अडकू लागतं. विशेषतः सांधेदुखी, चालण्यात अडथळा येणे, बोटं आखडणे ही लक्षणं आता वयोमानाशी जोडली जातात. मात्र ही लक्षणं केवळ वाढत्या वयाची खूण नसून, शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचीही सूचना असू शकतात.
आजच्या काळात युरिक अॅसिड वाढण्याची समस्या खूपच सामान्य झाली आहे. प्युरिन नावाचे रसायन शरीरात विरघळल्यावर युरिक अॅसिड तयार होते. साधारणपणे मूत्रपिंड हे फिल्टर करून शरीराबाहेर टाकते. मात्र, ते जास्त प्रमाणात तयार झाल्यास किंवा नीट बाहेर न गेले तर ते रक्तात व हाडांमध्ये क्रिस्टल्स स्वरूपात जमा होते. यामुळे सांधेदुखी, सूज, गाउट यांसारख्या समस्या निर्माण होतात. चुकीच्या आहारामुळे युरिक अॅसिड वाढते, तर काही अन्नपदार्थ युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात.
युरिक अॅसिड हे प्रत्यक्षात प्युरीन नावाच्या घटकाचं विघटन झाल्यानंतर तयार होणारं उपपदार्थ आहे. सामान्यतः ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकलं जातं. पण जर ते योग्यप्रकारे बाहेर पडलं नाही, तर रक्त आणि सांध्यांमध्ये साचतं आणि त्यामुळे सांधेदुखी, सूज, गाठी, तसेच संधिवातासारखे विकार उद्भवू शकतात.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे अनेकांना युरिक अॅसिडची समस्या जाणवते. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच युरिक अॅसिडची वाढलेली पातळी देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. शरीरात युरिक अॅसिड वाढल्याने प्रामुख्याने सांधेदुखी जाणवते, पण त्याचे इतर गंभीर परिणामही दिसून येतात.
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. त्यासोबतच काही सोपे घरगुती उपायही युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात..
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी उपयुक्त ४ पदार्थ
-
ज्वारीचं पीठ
– गव्हाऐवजी ज्वारीचं पीठ खाल्ल्याने युरिक अॅसिड नैसर्गिकरित्या कमी होतो.
– फायबर व खनिजे समृद्ध ज्वारी शरीर हलकं ठेवते आणि प्युरिनची पातळी नियंत्रित करते.
– ज्वारीच्या चपात्या, दलिया, सत्तू किंवा ज्वारीचं पाणी आहारात नियमित समाविष्ट करा. -
दोडक्याची भाजी आणि रस
– दाहविरोधी गुणधर्म असलेला दोडकं शरीरातून युरिक अॅसिड बाहेर टाकण्यास मदत करतो.
– किडनीचं कार्य सुधारतो आणि शरीराला हायड्रेट ठेवतो.
– भाजीसोबतच दोडक्याचा ताजा रस काळं मीठ आणि लिंबूरस घालून घेणं अधिक फायदेशीर. -
काकडी
– पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहतो.
– काकडीत असलेले व्हिटॅमिन A, B1, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम किडनी स्वच्छ ठेवतात.
– सॅलड किंवा ज्यूस स्वरूपात रोज काकडीचा आहारात समावेश करा. -
व्हिटॅमिन C समृद्ध फळं
– पेरू, संत्री, कीवी यांसारखी फळं युरिक अॅसिड कमी करण्यात प्रभावी.
– संशोधनानुसार व्हिटॅमिन C युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
– हे फळं रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात, ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता सुधारते.
तज्ञांच्या मते, सहज मिळणारी ओट्स (दलिया) व आले (अद्रक) या दोन गोष्टी मिळून युरिक अॅसिडवर जबरदस्त परिणाम करू शकतात. ओट्समध्ये नैसर्गिक अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करतात. तर आले म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं नैसर्गिक औषध आहे. दोन्ही घटक मिळून शरीर शुद्ध करतात, पचन सुधारतात व युरिक अॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी करतात. ओट्स आणि आलं यांच्या एकत्र सेवनामुळे संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी यांवरही चांगला परिणाम होतो. विशेष म्हणजे यामुळे मूत्रपिंडे आणि यकृताच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होते, जे युरिक अॅसिड बाहेर टाकण्यासाठी अत्यावश्यक आहे.
(डिस्क्लेमर: आपल्याला काही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

