तीक्ष्ण स्मरणशक्ती ही कोणत्याही व्यक्तीसाठी यश आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब आहे. पण स्मरणशक्ती कमजोर झाल्यास साधी कामेसुद्धा कठीण वाटू लागतात — वस्तू कुठे ठेवल्या, कोणते काम अपूर्ण राहिले, किंवा कोणाशी काय बोललो हेही आठवत नाही. त्यामुळे मजबूत आणि निरोगी स्मरणशक्ती राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी तीक्ष्ण स्मरणशक्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्मरणशक्ती कमकुवत असल्यास दैनंदिन कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, तर चांगली स्मरणशक्ती कामे अधिक सोपी आणि परिणामकारक बनवते. प्रत्येक व्यक्तीची लक्षात ठेवण्याची क्षमता वेगळी असते. काहींची स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या तीक्ष्ण असते, तर काहींना गोष्टी पटकन विसरतात. अनेकदा लोकांमध्ये यावरुन चर्चा आणि वाद ऐकायला मिळतो की, पुरुषांची स्मरणशक्ती जास्त तीक्ष्ण असते की स्त्रियांची?
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, महिलांची स्मरणशक्ती पुरुषांच्या तुलनेत अधिक तीक्ष्ण असते. कारण त्या वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखा किंवा इतर महत्त्वाच्या प्रसंगांच्या तारखा सहज लक्षात ठेवतात, तर पुरुष बहुतेकदा या गोष्टी हमखास विसरतात. त्यामुळे त्यांचेवर विसरभोळे असा शिक्का बसतो. मात्र, अलीकडील संशोधनाने ही समज पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. पाहूया, या संशोधनात नेमके काय निष्कर्ष समोर आले आहेत.
लखनऊ येथील केजीएमयू (किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी) आणि पीजीआय (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट) च्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. संशोधनानुसार, महिलांना विसरण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जवळपास तीनपट अधिक असते. प्रत्येक 100 पुरुषांपैकी 13 जणांना विसरण्याची समस्या आढळली, तर प्रत्येक 100 महिलांपैकी तब्बल 39 महिलांना ही समस्या जाणवली.
महिलांमध्ये विसरण्याची प्रमुख कारणे
१. ताण-तणाव:
घर, कुटुंब आणि कामाचे संतुलन राखताना महिलांवर सतत ताण येतो. हा दीर्घकालीन मानसिक ताण मेंदूच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करून स्मरणशक्ती कमी करतो.
२. अपुरा आहार:
आहारात लोह, व्हिटॅमिन B12 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता मेंदूला आवश्यक पोषण मिळू देत नाही. परिणामी मेंदूची कार्यक्षमता घटते आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते.
३. एकटेपणा आणि भावनिक ताण:
संशोधनात असेही दिसले की, एकट्या राहणाऱ्या महिलांना किंवा जोडीदार गमावलेल्या महिलांना विसरण्याची शक्यता अधिक असते. एकटेपणामुळे मेंदूतील सक्रियता कमी होते आणि मानसिक दुर्बलता वाढते.
ताण आणि स्मरणशक्तीचा थेट संबंध
तज्ञांच्या मते, पुरुष असो वा महिला — दीर्घकाळचा मानसिक ताण मेंदूवर ‘ओव्हरलोड’ निर्माण करतो, ज्यामुळे लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणे अवघड जाते. मेंदूला सतत विश्रांती, पोषण आणि सकारात्मकता मिळाली नाही, तर तो माहिती साठवण्याची क्षमता गमावतो.
स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यासाठी उपाय
- ओमेगा-3 युक्त आहार घ्या: मासे, अक्रोड, जवस यांचा समावेश करा.
- ध्यान आणि योगाचा सराव: दररोज काही मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम केल्याने ताण कमी होतो.
- पुरेशी झोप घ्या: दिवसातून किमान 7-8 तास झोप आवश्यक आहे.
- मानसिक सक्रियता वाढवा: कोडी सोडवा, नवीन भाषा शिका, पुस्तक वाचा.
- पाणी पुरेसे प्या आणि संतुलित आहार घ्या.
संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की, महिलांमध्ये विसरण्याची शक्यता जास्त असली तरी त्यांची स्मरणशक्ती कमकुवत नसते. ताण, आहार आणि जीवनशैली हे घटक या फरकाला कारणीभूत आहेत. योग्य जीवनशैली आणि मानसिक संतुलन राखल्यास पुरुष आणि महिला दोघेही आपली स्मरणशक्ती दीर्घकाळ तीक्ष्ण ठेवू शकतात.

