आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण त्याचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अनेक जण शौचालयात देखील मोबाईलशिवाय जात नाहीत. शौचालयात निवांतपणे बातम्या वाचणे, सोशल मीडिया वापरणे, रील्स पाहणे अशी सवय आता सामान्य झाली आहे. मात्र हीच सवय मूळव्याधाचा धोका लक्षणीयरीत्या वाढवते, असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
एका सर्व्हेमध्ये दोन-तृतीयांश (66%) लोकांनी टॉयलेटमध्ये फोन वापरल्याचे मान्य केले. पैकी 54.3% बातम्या वाचत होते, तर 44.4% सोशल मीडिया वापरत होते. फोन वापरणारे बहुतेक लोक शौचालयात पाच मिनिटांहून अधिक वेळ बसतात. डॉक्टरांच्या मते, शौचालयात स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रौढांमध्ये मूळव्याध होण्याची शक्यता 46% ने जास्त असते.
मूळव्याधाचा धोका का वाढतो?
- जास्त वेळ बसणे : फोनमध्ये गुंतल्याने शौचालयात बसण्याचा वेळ वाढतो.
- रक्तवाहिन्यांवर दबाव : गुदाशयातील रक्तवाहिन्यांवर सतत दबाव येतो, त्यामुळे त्या सूजतात आणि मूळव्याध निर्माण होतो.
- लक्ष विचलित होणे : जलद ब्रेक दीर्घ “स्क्रोलिंग सेशन” मध्ये बदलतो.
- एका अभ्यासानुसार, 37% फोन वापरकर्ते शौचालयात पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवतात. दीर्घकाळ बसल्याने गुदाशयातील ऊती कमकुवत होतात, ज्यामुळे कालांतराने मूळव्याध विकसित होतो.
पचन व आतड्यांवरील परिणाम
- टॉयलेट सीटवर बसल्याने पेल्विक फ्लोअरला योग्य आधार मिळत नाही.
- यामुळे गुदाशयाचा कोन अनियमित होतो, आतड्यांच्या हालचालींवर ताण येतो.
- दीर्घकाळ बसल्याने सूज, जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते.
तज्ञांच्या मते, योग्य आसन (पाय स्टूलवर ठेवणे आणि थोडे पुढे झुकणे) घेतल्यास आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि मूळव्याधाचा धोका कमी होतो.
मूळव्याधाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
- शौचालयात ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका.
- “दोन रील्स नियम” पाळा – दोन लहान व्हिडिओंपेक्षा जास्त पाहू नका.
- शक्य तितका फोनचा वापर टाळा.
- पोश्चरकडे लक्ष द्या – पाय स्टूलवर ठेवा, थोडं पुढं झुका.
मूळव्याधाची इतर कारणे
- वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असणे.
- गरोदरपणामुळे ओटीपोटावर वाढलेला ताण.
- स्थूलपणा.
- अपचन किंवा सतत जुलाब होणे.
- शौचास बसताना वारंवार जोर लावणे.
तज्ञांचा सल्ला असा आहे की, मोबाईल वापरामुळे केवळ लक्ष विचलित होत नाही तर त्याचे गंभीर आरोग्यदायी दुष्परिणामही आहेत. त्यामुळे शौचालयातील फोन स्क्रोलिंगची सवय वेळेत सोडा, नाहीतर ती “मूळव्याधीचे कारण” ठरू शकते.

