(जाकादेवी / वार्ताहर)
संमेश्वर तालुक्यातील समता मंडळ बोरसुत तसेच रमाई महिला मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आयु.शैला धोंडीराम गमरे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी शनिवार दि. २० रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
दिवंगत शैला धोंडीराम गमरे या अतिशय प्रेमळ, कष्टाळू आणि परोपकारी होत्या. शिक्षणावर त्यांची फार मोठी श्रद्धा होती. त्यांनी आपल्या मुला- मुलींना उच्चशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. मुलींना उच्चशिक्षण देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांनी आपल्या पतीच्या साथीने मोठ्या हिमतीने आपला आदर्शवत संसार फुलविला. सामाजिक व धार्मिक क्षेत्राचीही त्यांना आवड होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या अनेकांच्या सुख दुःखात सहभागी होत.बुध्द-फुले- शाहू -आंबेडकरी विचारधारेवर त्यांची निष्ठा होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, सूना, नातवंडे, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. त्यांचा पुण्यानुमोदन धार्मिक विधी सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा.संगमेश्वर तालुक्यातील बोरसूत गावी होणार आहे.

