(रत्नागिरी)
कु.पवन विलास जाधव (वय ३१ वर्ष, शिक्षण १२वी, मु.पो. ता.जि.रत्नागिरी) २०१२ साली वयाच्या १८ व्या वर्षी १२वीची परिक्षा झाल्याने मित्राला मदत म्हणून प्रायव्हेट बसबरोबर गेला असता बसचा अपघात झाला. त्यावेळी डेरवणला वालावलकर हॉस्पीटलमधे दाखवण्यात आले. त्यांनी तपासुन पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने पुढे केईएम हॉस्पीटल मुंबईला पाठविले. तिथे अॅडमीट करुन ट्रीटमेंट चालु केली.
एक महीना झाला तरी फारसा फरक न पडल्याने संचेती हॉस्पीटल पुणे येथे अॅडमीट करुन पाठीच्या मणक्यावर शस्रक्रिया करण्यात आली. पण पाठीपासुन खालील भागाच्या पुर्ण संवेदना जावुन तो पॅराप्लेजिक झाला होता. यूरीन मोशनच्या संवेदन गेल्याने काही कळत नव्हते. चालता येणे बंद होवुन तो पुर्ण परावलंबी झाला होता. नंतर हजीअलीला सहा महिने राहुन फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घेतली. वयाची ४ वर्ष ट्रीटमेंटमध्येच गेल्याने शिक्षण बंद झाले.
वडील विलास सदाशिव जाधव शेती करतात, तर आई वर्षा या गृहीणी आहेत. पवनला एक भाऊ प्रणित विलास जाधव मुंबईत एका अॉनलाईन कंपनीत काम करतो, तर एक बहीण प्रणिता विलास जाधव विवाहीत आहे.
पवन दिवसभर घरीतच बेडवर पडुन रहायचा. बाहेर घेवुन जाताना पवनला उचलुनच न्यायला लागायचे. त्याची आई त्याला आवरायला सर्व मदत करायची. २०१९ साली चिपळुणला एका शिबीरादरम्यान आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादीक नाकाडे यांची ओळख झाली. पवनच्या पालकांनी पवनची संपुर्ण माहीती सांगितली, आणि त्याच्यासाठी संस्थेतर्फे व्हीलचेअरची मागणी केली. तोपर्यत ७ वर्ष पवन बेडवरच घरी असायचा.
सादीक नाकाडे यांनी पवनच्या घरी जावुन त्याची व त्याच्या घराची संपुर्ण माहीती घेतली. पवनला संस्थेतर्फे नवीन व्हीलचेअर दिली. त्याचबरोबर पवनला पॅराप्लेजिक लोकांनी स्वत:ची काळजी कशी घेतली पाहीजे? बेडसोअर होवु नयेत यासाठी काय काय काळजी घेतली पाहीजे? पोटसाफ कस करायचे? युरीनसाठी काय वापरायचे? युरीन ईन्फेक्शन होवु नये यासाठी कशी काळजी घ्यायची? बेडवरुन व्हीलचेअरवर आणि व्हीलचेअरवरुन परत बेडवर कसे शिफ्ट व्हायचे? या सर्वांचे ट्रेनिंग पवनला दिले. पवनला व्हीलचेअर मिळाल्याने तो बराच स्वावलंबी झाला. त्याच्या घरच्यांचा उचलुन घेवुन जाण्याचा त्रास कमी झाला. पण त्याला घराबाहेर जावुन काही काम करायचे असल्यास तो इतरांवर अवलंबून होता. कारण व्हीलचेअरवरुन खुप लांब जावुन येणे सहज शक्य नव्हते. त्यासाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी सादिक नाकाडे यांचेकडे मागणी केली.
आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी चे संस्थापक व अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी इम्पॅक्ट गुरू फाऊंडेशन यांच्या साहाय्याने निओ मोशनची इलेक्ट्रिक व्हीलचेअर पवन जाधव याला देण्यात आली व मुंबईला झोमॅटोमध्ये डिलिव्हरी चे काम ही मिळवुन देण्यात आले.
पवनने आणि त्यांच्या फॅमिली मेंम्बर्सनी आरएचपी फाउंडेशन आणि ईतर सर्वांचेच मनापासुन आभार मानले आहेत.