चिपळूण काँग्रेसचा ठाम पवित्रा : नगराध्यक्ष पद आम्हालाच द्या, नाहीतर आघाडी नाही!
लियाकत शहा यांच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीत खळबळ
तिवरे-देवळे येथे दुर्मीळ पक्षी शिळकरी कस्तुर आढळला; जखमी अवस्थेत उडू न शकणाऱ्या पक्षाला जीवदानाची गरज, स्थानिकांकडून आवाहन
(साखरपा / दीपक कांबळे) तिवरे तर्फे देवळे (ता. संगमेश्वर) येथील बौद्धवाडीत शुक्रवारी सायंकाळी एक शिळकरी कस्तुर नावाचा रंगीत व दुर्मीळ पक्षी जखमी अवस्थेत आढळला. स्थानिक पत्रकार दीपक कांबळे यांच्या घराशेजारी…
तायक्वांदो स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या संगम चव्हाण चा ओमसाई शांती ग्रुप तर्फे विशेष सत्कार
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावचा सुपुत्र आणि मालगुंड येथील मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज आणि बळीराम परकर विद्यालयाचा इयत्ता सहावी अ तील विद्यार्थी…
खोंडा परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात; चालक किरकोळ जखमी, जीवितहानी टळली
(दापोली) दापोली तालुक्यातील खोंडा परिसरात गुरुवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. दापोली–मंडणगड महामार्गावरील जाहिद कॉम्प्लेक्ससमोरील पुलाजवळ घडलेल्या या अपघातात कारचा समोरील भाग अक्षरशः चुराडा…
घरफोडीचा छडा अवघ्या २४ तासांत! मंडणगड पोलिसांची कारवाई
(मंडणगड) मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा अवघ्या २४ तासांत लावून मंडणगड पोलिसांनी आपली दक्षता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रकरणात चोरीस गेलेला संपूर्ण…
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा. दिलीप…
देवळेतील सुनंदा मेडिकलला पहाटे अचानक लागली आग; लाखोंचे नुकसान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील मुख्य बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला आज पहाटे अचानक आग लागली. सकाळी सुमारे 5 ते 5.30 च्या दरम्यान सर्वसामसूम असताना ही आग लागली…
‘पोक्सो’ अंतर्गत आणखी एक गुन्हा; मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः संताप उसळला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्यान्वये दुसरा गुन्हा नोंदवला गेल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मायक्रो…
रत्नागिरीत पतीची पत्नीला मारहाण : पोलीस पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात पोलीस कर्मचारी असलेल्या पतीसह तिघांविरुद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती निलेश भागवत (वय 37, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी)…
दिग्गज शिक्षक नेत्यांचा प्रवेश; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात नवीन ऊर्जेचा संचार
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटित, पारदर्शक आणि संघर्षशील कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी संघात भव्य प्रवेश केला. या प्रवेशामुळे संघटनेत नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…

