(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाची वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.
यामध्ये श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. रविकिरण धर्माजी तोडणकर यांची निवड करण्यात आली. याआधी त्यांनी गेली तीन वर्षे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.
तसेच उपाध्यक्षपदी श्री. उदयराज पु. भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव : श्री. दिलीप पां. पाटील, सहसचिव : श्री. महेश म. सुतार, कार्याध्यक्ष : श्री. प्रमोद स. पाटील, खजिनदार : श्री. रत्नाकर भोसले, सहखजिनदार : श्री. रमाकांत सं. पांचाळ, क्रीडाप्रमुख : श्री. प्रणव र. तोडणकर, उपक्रीडाप्रमुख : श्री. गणेश अ. तोडणकर अशी निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल गावखडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक व हितचिंतकांकडून सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

