(रत्नागिरी)
आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम अंतर्गत
श्री क्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या भक्त शिष्यानी आज हा उपक्रम राबवला. या उपक्रमात रत्नागिरीतील रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे अनेक भक्त शिष्य सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत महिलांचाही सहभाग मोठा होता. या कार्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
किनाऱ्यावरील प्लास्टिक बॉटल्या, प्लास्टिक पिशव्या, काटक्या, लाकडाचे ओंडके, तारा, वायरचे तुकडे, कागद व अन्य कचरा गोळा करण्यात आला. नंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या सागरी किनारा स्वच्छता मोहिमेमध्ये राजेंद्र खांबळ, गोरक्षनाथ साळवी, अमोल वाडकर, वासुदेव निंबरे, निता जाधव, वीरेंद्र जाक्कर, गिरिजा साळवी सिद्धी दुर्गवली, गणेश दुर्गवली किसन पांचाळ यांच्यासह अनेक भक्त शिष्य उपस्थित होते.

