( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
रत्नागिरी येथे सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. हे प्रशिक्षण सत्र फाटक व पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे घेतले जात आहे.
या प्रशिक्षणात वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कला व क्रीडा गटातील शिक्षक सहभागी झाले आहेत. विशेषतः कला व क्रीडा गटातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले आहे.
या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रा. प्रभात कोकजे, प्रा. सागर पोकळे, प्रा. सौ. मानसी गानू, प्रा. सुनील जोपळे आदी सुलभक (मास्टर ट्रेनर्स) अत्यंत प्रभावी व सुलभ पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
या गटातील काही शिक्षक सात दिवसांचे रत्नागिरीतील प्रशिक्षण पूर्ण करून पुढील टप्प्यासाठी कोल्हापूरला रवाना झाले. यावेळी त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
हे संपूर्ण प्रशिक्षण DIET रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. सुशीलकुमार शिवलकर, मुख्य समन्वयक श्री. राहुल बर्वे, तसेच श्री. राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडत आहे.