(चिपळूण)
डी.बी.जे.महाविद्यालय, चिपळूण येथील चिन्मयी ऋतुजा ऋषिकेश ढगळे हिची कबड्डी करिता मुंबई विद्यापीठ संघात निवड झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली 10 वर्षे केलेल्या परिश्रमाचे फळ तिला नेहमीच मिळत आले आहे. चिन्मयीने असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसोबतच, रत्नागिरी जिल्ह्याचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमीची चिन्मयी ढगळे या राज्यस्तरीय खेळाडूने मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने मुंबई विद्यापीठाच्या अंतिम यादीत नाव समाविष्ट झाले. चिन्मयी ढगळे हिला तिची आई ऋतुजा ढगळे व वडील राज्यस्तरीय कबड्डी पंच ऋषिकेश ढगळे यांचे कायम मार्गदर्शन व पाठिंबा लाभला आहे.
राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक संतोष शिर्के, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कुलभूषण कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचा भक्कम पाठिंबा सदैव लाभला असल्याने चिन्मयी मोठे यश मिळवू शकली असल्याचे मत वडील राज्यस्तरीय कबड्डी पंच ऋषिकेश ढगळे यांनी व्यक्त केले. चिन्मयी ढगळे हिचे मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाल्याने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष उदय सामंत यांनी व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

