(नवी दिल्ली)
भारतीय नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट (ई-पासपोर्ट) योजना आता देशभर सुरू करण्यात आली आहे. बायोमेट्रिक माहिती असलेली RFID चिप यामध्ये बसवण्यात आली असून, त्यामुळे सुरक्षा आणि बनावट कागदपत्रे रोखण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही योजना १ एप्रिल २०२४ रोजी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती.
सध्या ई-पासपोर्ट फक्त काही पासपोर्ट कार्यालयांत उपलब्ध आहेत, मात्र पुढील काही महिन्यांत ही सेवा सर्व केंद्रांपर्यंत टप्प्याटप्प्याने विस्तारली जाणार आहे. सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळा दिसण्यासाठी याच्या कव्हरवर शीर्षकाखाली सोनेरी रंगाचे छोटे चिन्ह छापलेले असेल.
ई-पासपोर्ट म्हणजे काय?
- ई-पासपोर्ट हा पारंपरिक पासपोर्टचा आधुनिक आणि सुरक्षित पर्याय आहे.
- कव्हरमध्ये बसवलेल्या RFID चिप व अँटेना द्वारे बायोमेट्रिक माहिती साठवली जाते.
- या चिपमध्ये फिंगरप्रिंट्स, चेहऱ्याचा फोटो, डोळ्यांच्या बाहुलीचे (Iris) स्कॅन, नाव, जन्मतारीख व पासपोर्ट क्रमांक यांसारखी माहिती समाविष्ट असते.
- ही माहिती एनक्रिप्टेड ॲक्सेससह सुरक्षित केली जाते.
- आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार याची निर्मिती करण्यात आली आहे.
ई-पासपोर्टची मुख्य वैशिष्ट्ये
- बायोमेट्रिक व वैयक्तिक माहिती असलेली सुरक्षित चिप.
- बनावट कागदपत्रे तयार होण्याची शक्यता कमी.
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अधिक सुरक्षित व जलद तपासणी प्रक्रिया.
ई-पासपोर्टसाठी अर्ज प्रक्रिया
- ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची पद्धत नेहमीच्या पासपोर्टसारखीच आहे:
- पासपोर्ट सेवा वेबसाइटवर लॉगिन/नोंदणी करा.
- ई-पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरा.
- जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र निवडा.
- आवश्यक शुल्क ऑनलाइन भरा.
- मुलाखतीसाठी (Appointment) वेळ निश्चित करा आणि संबंधित केंद्रावर भेट द्या.

