(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली ने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. यामध्ये 14 ,17 व 19 वर्षाआतील मुलांच्या विविध वजनी गटांमध्ये पाली हायस्कूलने तब्बल सहा सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
या सहा ही कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी स्पर्धकांमध्ये 14 वर्षाआतील मुले कुमार, अथर्व अजित गराटे
(इयत्ता- आठवी क )
52 किलो वजनी गट-
प्रथम क्रमांक विभागस्तरीय निवड ,कुमार वरद सुभाष धाडवे
(इयत्ता- आठवी क )
57 किलो वजनी गट-
प्रथम क्रमांक विभागस्तरीय निवड
17 वर्षा आतील मुले
कुमार दुर्वांक दिनेश नागले
इयत्ता- अकरावी विज्ञान
110 किलो वजनी गट
प्रथम क्रमांक विभागस्तरीय निवड
19 वर्षा आतील मुले
कुमार वेदांत यशवंत नागले
(इयत्ता – बारावी )
61 किलो वजनी गट
प्रथम क्रमांक विभागस्तरीय निवड
कुमार गौरव नंदकुमार नागले
(इयत्ता अकरावी)
79 किलो वजनी गट
प्रथम क्रमांक [विभागस्तरीय निवड ]
कुमार सोहम सुधर्म सावंतदेसाई
(इयत्ता – बारावी विज्ञान)
125 किलो वजनी गट
प्रथम क्रमांक विभागस्तरीय निवड.
वरील सहा ही विद्यार्थ्यांची दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाली मधून सहा कुस्तीपटू सहभागी झाले होते. या सहा ही खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून शंभर टक्के यश संपादन केले आहे. कोल्हापूर विभागीय स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी करणार आहेत.

