(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या भारतीय समूह गायन कला प्रकारांमध्ये मुंबई विद्यापीठांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. देशभक्तीपर गीत आणि लोकगीत या दोन गीतांचे सादरीकरण होत असते यामध्ये विद्यार्थी आणि साथीदार यांच्या सादरीकरणाचा प्रभाव किती आहे हे परीक्षकातर्फे पाहिले जाते.
जिल्हा स्तरावर गोगटेच्या भारतीय समूह गायनाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता अंतिम स्पर्धेमध्ये एकूण ३५ संघाने सहभाग घेतला होता. या कला प्रकारामध्ये मुंबई व्यतिरिक्त पारितोषिक प्राप्त होणारे एकमेव महाविद्यालय आहे.
या स्पर्धेमध्ये गीतकार संगीतकार -ओंकार बंडबे काश्मिरा सावंत, वादक – अमेय किल्लेकर शार्दूल मोरे, स्वरूप नेने, गायक विद्यार्थी – दीक्षा कामत, दुक्षा कुड, मिथिला नाखरेकर, सेजल तांबे, समृद्धी उकिडवे सहभागी झाले होते.
सदर यशाबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर प्राचार्य मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले आहे.

