(रत्नागिरी)
तालुक्यातील सत्कोंडी येथील चिरेबंदी पाखाडीवर रविवारी (ता. १४) सकाळी एका प्रौढाचा घसरुन मृत्यू झाला. मृताचे नाव प्रवीण लक्ष्मण शिगवण (वय ४७, रा. शिगवणवाडी, सत्कोंडी) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शिगवण हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. पन्हळी–सत्कोंडी पायवाटेवरील चिरेबंदी पाखाडीवर त्यांचा पाय घसरला व ते उपडी पडले. पोलिस पाटील पन्हळी यांनी तत्काळ जयगड पोलिसांना याची माहिती दिली.
जयगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रवीण शिगवण यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा येथे हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

