( संगमेश्वर / प्रतिनिधी )
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागाच्या गुरुकुलचा निकाल १००% लागला आहे. गुरुकुल विभागाची ही पहिलीच बॅच असल्यामुळेसर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थी म्हापुस्कर कनक प्रसाद ९६.४, खरे वेदांत विश्वास ९३.२०, घुमे वेदांत उदय ९३.००, दिंडे अक्षता सुनील ९१.४, पोटे क्षितिज विवेक ८४.४, लटके मोहित अजित ८४.२०, मुसळे कैवल्य संदीप ८१.८, आग्रे आयुष दत्ताराम ७८.००, गुरुकुल मधील या आठ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे.
गुरुकुल मधील विद्यार्थिनी कु.कनक प्रसाद म्हापुस्कर हिने मिळवला युनायटेड मधील एकूण २२० विद्यार्थ्यांमध्ये पाचवा क्रमांक. शालांत परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे सर , पर्यवेक्षिका सौ.रेवती कारदगे मॅडम, गुरुकुल विभाग प्रमुख मंगेश मोने सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन