( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मासिक गुन्हे आढावा बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी शहरातील तीन खुनांच्या गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना गजाआड करणाऱ्या पथकाचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ, सहाय्यक फौजदार दीपक साळवी, हेडकॉन्स्टेबल आशिष भालेकर, अमित पालवे, पंकज पडेलकर व भालचंद्र मयेकर यांचा समावेश आहे.
यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये दापोली पोलीस ठाण्याचे दबंग निरीक्षक महेश तोरसकर, पूर्णगड पोलीस ठाण्याचे एपीआय संजय पाटील, नाटे पोलीस ठाण्याचे एपीआय वाघ, तसेच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक झावरे यांचा समावेश आहे.
दरम्यान, अंमली पदार्थांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात धडाकेबाज मोहिमा राबविणाऱ्या LCB (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाचाही विशेष सन्मान करण्यात आला. या पथकात पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, एसआयआय गोरे, तसेच हेडकॉन्स्टेबल दीपराज पाटील, प्रवीण खांबे, गणेश सावंत, अमित कदम, नितीन डोमणे, भैरवनाथ सवीराम, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर व शांताराम झोरे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, श्री. नितीन बगाटे हे पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीचे अधीक्षक कुलकर्णी यांच्या कार्यकाळातील गुन्ह्यांची उकल होण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तपासकाम अधिक गतीमान झाले असून पोलीस दलाला यश मिळत आहे.

