(रत्नागिरी)
“प्रामाणिकपणा हा यशस्वी उद्योजकतेचा मूलमंत्र आहे. मराठी माणसाने आता नोकरीच्या पलीकडे जाऊन उद्योगाच्या दिशेने वाटचाल करावी. उद्योजकतेचा विकास हाच आपला खरा ध्यास असावा,” असे स्पष्ट मत उद्योजक धर्मेंद्र सावंत यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या प्रतिष्ठित संकल्प कला मंच या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ३१व्या “गुणगौरव” सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा सोहळा सुशिलाबाई दाते सभागृह, महिला मंडळ, मारुती मंदिर रत्नागिरी येथे संपन्न झाला.
मुख्य पाहुणे म्हणून प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सौ. कल्पना मेहता आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विनयराज उपरकर, माजी अध्यक्ष विनोद वायंगणकर, तसेच प्रमुख सल्लागार डॉ. दिलीप पांखरे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव नांदगावकर यांच्या सादरीकरणातून ‘महाराष्ट्र गीत’ गाऊन करण्यात आली. डॉ. कल्पना मेहता म्हणाल्या, “गुणवंतांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे.” त्यांनी एका गुरुगौरवपर कथेद्वारे या विचारांना अधोरेखित केले.
डॉ. शाश्वत शेरे यांनी “गौरव समारंभामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संकल्प कला मंचचा ‘गुणगौरव’ हा उपक्रम गौरवास्पद आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांना यापूर्वी ‘अविष्कार’ निर्मितीसाठी पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
धर्मेंद्र सावंत : मराठी युवकांनी उद्योगाकडे वळावे
अध्यक्षीय भाषणात श्री. धर्मेंद्र सावंत म्हणाले, “उद्योजकतेचा विकास होण्यासाठी मराठी तरुणांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. मराठी समाजाने उद्योजकतेकडे वळून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारायला हवा. संकल्प मंचचा हा सन्मान सोहळा जिल्ह्यातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
३१ गुणवंतांचा सन्मान
अविष्कार निर्मित पुष्प, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन पुढील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला:
1. कु. रिद्धी केतन चव्हाण (क्रीडा)
2. कु. तन्वी मंगेश मोरे (संगीत)
3. श्री. विकास साखळकर (सामाजिक)
4. कु. स्वरा साखळकर (क्रीडा)
5. हेमोफिलिया सोसायटी – रत्नागिरी
6. श्री. राजेंद्र सावंत (पोलीस दल)
7. श्रीमती वैशाली खाडीलकर (रक्तदान)
8. श्री. राज पूजा कांबळे (अपंगत्वावर मात)
9. सोमेश्वर शांतीपीठ संस्था (गोरक्षण व संवर्धन)
10. श्री. महेश बने (फेटे बांधणे)
11. श्रीमती स्मिता साळवी (योगशिक्षण)
12. श्री. मनोज लेले (पत्रकारिता)
13. श्रीमती नेत्रा राजेशिर्के (गिर्यारोहण)
14. श्रीमती स्वप्नजा मोहिते (कथासंग्रह/चित्रकला)
15. श्रीमती वृषाली टाकळे (कथासंग्रह)
16. डॉ. शाश्वत शेरे (अनुवाद)
17. श्री. मुकुंद शेवडे (काव्यसंग्रह)
18. श्री. ओंकार रहाटे (इंग्रजी कादंबरी)
19. श्री. रुपेश पेडणेकर (सामाजिक)
20. श्री. दुर्गेश आखाडे (कथासंग्रह)
21. श्री. विनायक खानविलकर (सांस्कृतिक)
22. श्री. अमरीष पवार (प्रामाणिकपणा)
23. श्री. विनोद कदम (पत्रकारिता)
24. श्री. महेश मयेकर (मिमिक्री)
25. श्रीमती रक्षिता पालय (अभिनय)
26. श्रीमती कोमल सोनावणे (शैक्षणिक)
27. श्री. अभिषेक पाटील (शैक्षणिक)
28. श्री. विनोद वायंगणकर (सामाजिक/रक्तदान)
29. कु. इशान कासेकर (शैक्षणिक)
30. कु. स्वरदा कांबळे (शैक्षणिक)
31. श्री. साहिल तांबट (शैक्षणिक)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनवंत कासेकर आणि सौ. सुकन्या ओळकर यांनी केले. त्यांना श्रीमती शलाका सावंतदेसाई यांची साथ लाभली. श्री. ज्ञानेश्वर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सत्यविजय शिवलकर, श्री. कृष्णकांत साळवी, श्री. चंद्रकांत कांबळे, श्री. नंदकुमार भारती, श्री. रविंद्र मुळये, श्री. गोविंद ठिक, श्री. मयूर पाडवे, श्री. आशिष पाटील, श्री. प्रसाद सुर्वे, श्री. सागर वायंगणकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.