(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथील शिवशक्ती युवा मित्र मंडळाकडून दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी यां मंडळाचे हे नववे वर्ष होते. शिवशक्ती मंडळाकडून दरवर्षी गणेश उत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याप्रमाणे ह्याही वर्षी मंडळाने महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा तसेच लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांना स्टेज उपलब्ध करून वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.
वाडीतील सर्वच लहान मुलांनी ह्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला होता. यामध्ये रांगोळी स्पर्धेचे परीक्षण शैलेश रोडे, महेश गांगण तसेच राजेश गांगण यांनी केले तर डान्स व वक्तृत्व स्पर्धचे परीक्षण मंगेश पराडकर ह्यांच्या उत्तम सहकार्याने शुभांगी सागरे मॅडम व शुशांत जाधव यांनी केले.
संतोष शेट्ये यांच्या अध्यक्षेखाली सर्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धाचे सूत्रसंचालन संजय शेट्ये ह्यांनी केले. तसेच मंडळाचे खजिनदार, प्रवक्ते, सल्लागार, आणि सेक्रेटरी ह्यांचे विशेष सहकार्य यां कार्यक्रमाला लाभले.

