(जाकादेवी / वार्ताहर)
नवी मुंबई येथील कला साधना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय पुज्य साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार २०२५ कामोठे नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला.
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे सुपुत्र कवी – लेखक, मुक्त पत्रकार अमित जयवंत कांबळे यांना राष्ट्रस्तरीय पूज्य साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार भारत सरकार (पद्मश्री) ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय सुलेखनकार श्री.अच्युत पालव, डॉ.दिगंबर तायडे (पद्मश्री),कॅप्टन – मनोज भामरे (माजी.लष्करी अधिकारी), रामजीत( जितू) महादेव गुप्ता – (मुख्य तपास अधिकारी अँटिपायरसी सेल मुंबई (समाज सेवक) यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रस्तावासाठी संस्थेकडे एकूण ८३० अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधून एकूण ५० मान्यवरांची निवड करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे अमित जयवंत कांबळे यांना शैक्षणिक, सामाजिक, कला अशा विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट लेखन साहित्याबद्ल त्यांना २०२५ या वर्षीचा कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई तर्फे राष्ट्रस्तरीय पूज्य साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमित कांबळे यांनी आजपर्यंत विविध ज्वलंत विषयांवर प्रबोधनपर लेखन केले आहे.२००३पासून कोंकण व मुंबई विभागातील साहित्यिक दैनिकांतून त्यांचे लेखन साहित्य प्रकाशित झाले आहे.

