(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशन नोंदणीकृत संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी कसबा गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या नगमा आर वारुणकर यांची नियुक्ती झाली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र आर चौधरी यांच्या सस्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष नगमा आर वारुणकर यांचे अनेक स्तरावरून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षावही केला जात आहे.
चिपळूण गोवळकोट येथील माहेरवाशीनण तर संगमेश्वर तालुक्यातील सासरवाशीण असलेल्या नगमा वारुणकर यांना समाजकार्य करण्याची आवड असून त्यांची समाजकार्यासाठी असलेली नेहमीच्या धडपडीची दखल राज्यस्तरावरील पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनने घेऊन त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
संघटनेतील कामाला गती देण्याबरोबर पोलीस मित्र सेवाभावी फउंडेशनच्या उद्दिष्टांमध्ये आणि पोलिसांच्या प्रचारात आणि लोकांना जोडण्यासाठी नेहमीच सक्रिय भूमिका असेल. संघटनेकडे आणि पोलिसांच्या समस्यांकडे लक्ष देऊन संघटना आणि समाजाला पुढे नेण्यासाठी विशेष मदत करण्याचा प्रामाणिक पर्यंत करेन, असा विश्वास नगमा आर वारुणकर यांनी दिला आहे.
एका महिलेला पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षाची जबाबदारी नगमा आर फाउंडेशन यांना देण्यात आल्याने व ती जबाबदारी स्वीकारू लिलया पार पाडण्याची हमी देणाऱ्या नवनिर्वाचित महिला अध्यक्ष नगमा आर वारुणकर यांना प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाट्सऍप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियावरून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

