(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.
संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मागझन दुरक्षेत्र, डिंगणी दुरक्षेत्र, आरवली पोलीस चौकी तसेच कडवई-वांद्री परिसरात पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण व निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
गणेशोत्सव काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी, सतत सुरू असलेला पाऊस व वाहतुकीची कोंडी यावर नियंत्रण ठेवत शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. रात्रीची गस्त, येणाऱ्या तक्रारींचे निवारण, नियमित कामकाज या सर्वांसोबतच पोलीस स्टेशन प्रांगणात स्थापन केलेल्या गणरायाची सेवा आणि दररोज आयोजित उपक्रमही त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले.
याशिवाय पोलीस पाटील अंगराज कोळवणकर व सुभाष गुरव यांनीही बंदोबस्तात मोलाची सेवा बजावली. नागरिकांनीदेखील पोलिसांना उत्स्फूर्त सहकार्य दिल्याने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.

