(चिपळूण / मिलिंद देसाई)
श्री. राजेंद्र रेमणे (वय ५९, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांचे ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
कै. रेमणे यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी स्वाती रेमणे आणि मुलगी श्रद्धा रेमणे यांनी दिवंगत राजेंद्र रेमणे यांची अंतिम इच्छा पूर्ण करत त्यांचे पार्थिव भ.क.ल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण येथे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी सुपूर्द केले. तसेच, त्यांचे नेत्रदानही करण्यात आले असून त्यामुळे दोन व्यक्तींना नव्याने जग पाहण्याची संधी मिळणार आहे.
या प्रसंगी पत्नी स्वाती रेमणे, मुलगी श्रद्धा रेमणे, मेहुणे मिलिंद देसाई, मयूर देसाई आदी नातेवाईक उपस्थित होते. रेमणे कुटुंबीयांनी आपल्या प्रिय व्यक्तीची अखेरची इच्छा पूर्ण करून समाजापुढे मानवतेची आणि सेवेची आदर्श परंपरा निर्माण केली आहे.

