(रत्नागिरी)
कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलने तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविले. रत्नागिरी पोलीस परेड मैदान येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुला- मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूल- उद्यमनगर कॉन्व्हेंट स्कूल या मुलांच्या संघांमध्ये लढत झाली व या स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलने ४:२ गोल करून प्रथम क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने देखील उद्यम नगर कॉन्व्हेंट स्कूल या संघाबरोबर ४:२ गोल करून प्रथम क्रमांक मिळविला.
मुला- मुलींच्या दोन्ही संघांना क्रीडाशिक्षक अजित धावडे, स्वप्नाली पवार, मार्गदर्शक प्रवीण आंबेरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.

