(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी-तारवेवाडी येथे पडक्या घरामध्ये ४१ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्तीची ओळख प्रसाद श्रीराम कोकजे (रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) अशी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद कोकजे हे दारूच्या आहारी गेलेले होते. दारू सेवन केल्यानंतर ते निवळी-तारवेवाडी येथील श्री पवार यांच्या जागेतील एका पडक्या घरात मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

