(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वांद्री ते आरवली कामाची पाहणी केली. येणाऱ्या गणपतीच्या उत्सवानिमित्ताने ही पाहणी करण्यात आली.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्याना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच ठेकेदार, पोलीस प्रशासन, यांच्या समावेत ही पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांची ही चर्चा संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात येणाऱ्या अडचणी ट्राफिकबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कुलकर्णी, कोशिक रहाटे, जे. एम. म्हात्रे चे जी एम हलेश, संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, त्याचप्रमाणे इतर अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.