( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुलचा दहावीचा यावर्षी देखील एकूण सरासरी निकाल-९७.८३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखल्याने संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
इयत्ता दहावी मध्ये प्रशालेत प्रथम क्रमांक – प्रांजल प्रमोद गुरव ४८१/५००, ९६.२० % द्वितीय क्रमांक – मुळये आदिती महेश ४५२/५००, ९०.४० % तृतीय क्रमांक – पवार ओमकार नंदकुमार ४३६/५००, ८७.२०, % चतुर्थ – चव्हाण अथर्व ४२५/५००, ८५.०० % पाचवा ढाकणे सुयश मनोहर ४१६/५००, ८३.००% , प्रविष्ठ एकूण विदयार्थी- ९२, उत्तीर्ण विदयार्थी-९० अनुत्तीर्ण–०२