( रत्नागिरी )
गौरी-गणपती उत्सवानिमित्त आंबेकरवाडी येथील ‘रॉयल प्रतिष्ठान’ तर्फे लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विविधरंगी अभिनय व वेषभूषा सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाडीतील पोलिस पाटील वासंती आंबेकर उपस्थित होत्या. तसेच मनोहर आंबेकर, प्रकाश आंबेकर, योगेश आंबेकर, शैलेश आंबेकर, हेमंत आंबेकर, स्वीकार आंबेकर, जयेश आंबेकर आणि शिशिर आंबेकर यांच्या हस्ते स्पर्धक मुलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे लहान मुलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळाले. पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

