(रत्नागिरी)
महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कोकण विजय 26’ सागरी नौका भ्रमण मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा पूर्णगड क्रमांक १ (ता. जि. रत्नागिरी) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात “स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण” या संकल्पनेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण जागृती रॅली काढण्यात आली.
एनसीसी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संघभावना, शिस्त, आणि साहसीवृत्ती यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शिडाची जहाजे आणि विविध सागरी बोटींचे कार्यप्रणाली याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि एनसीसी कॅडेट्स यांचे स्वागत मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांनी केले. यावेळी शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर आणि तृप्ती शिरगावकर यांनीही आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, तसेच शिक्षण बीट विस्तार अधिकारी हिरवे मॅडम आणि केंद्रप्रमुख संजय राणे सर यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.

