(रत्नागिरी)
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. रत्नागिरी या संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी’ होत असते. संस्थेमार्फत न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे ता. रलागिरी व न्यू इंग्लिश स्कूल पडवे, ता गुहागर या दोन शाळा चालविल्या जातात. नुकताच शैक्षणिक वर्ष-2024 – 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे ता. जि. रत्नागिरी प्रशालेत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री.सज्जाद अ.करीम सय्यद होते. यावेळी विचारमंचावर सैतवडे गावचे सरपंच श्री.साजिदभाई शेकासन, संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ.अजिज इस्माईल मुकादम, सैतवडे गावचे माजी पोलिसपाटील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.इब्राहिम मुल्ला, सैतवडे बनवाडीचे वाडीप्रमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मश्री.रमेश शिर्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लियाकत शेकासन, सैतवडे गावचे सुपूत्र, हितचिंतक श्री. जमीर भोंबल, शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष सौ.शितल रमेश कनगुटकर, संस्था खजिनदार श्री.वहाबभाई खलपे,संस्था सदस्य श्री.जावेद काझी, श्री.मुझफ्फर सय्यद, न्यू इरा इंग्लिश मेडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. इम्रान अंतुलेसर, सैतवडे गावचे सुपुत्र श्री.सलीम चिकटे, पन्हळी गावचे पोलिस पाटील मा. श्री महेश सुर्यकांत महाकाळ, न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी सुभाष लांजेकर, न्यू इंग्लिश स्कूल पडवे ता. गुहागरचे मुख्याध्यापक श्री. सुर्यवंशीसर व सैतवडे आरोग्य वर्धिनीच्या सौ. धनश्री पावरी धातकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सज्जादभाई सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांचे बुके देऊन यथोचित स्वागत व सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी लांजेकर यांनी केले. गुणवंतांचा सत्कार करताना 1)कु. संबोधी देवेंद्र पवार इ.8वी राहणार बलभिम नगर हिने NMMS परीक्षेत प्राविण्य संपादन केल्याबद्दल, 2)रिया नितेश महाकाळ इयत्ता 8 वी गाव – पन्हळी हिने नगर परिषद रत्नागिरी व कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित जिल्हा स्तरावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्राविण्य संपादन केल्याबद्दल व कलाध्यापक संघामार्फत आयोजित राज्यस्तरीय ऋतुरंग स्पर्धेत विशेष कलाकृती सादर केल्याबद्दल, 3)कुमारी वेदिका दत्तात्रय चादर भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन या राज्य स्तरावरील स्पर्धापरीक्षामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलाबद्दल 4) कुमार मेहराजअली रिजवान शेकासन याने नॅब चिपळूण संस्थेच्या राष्ट्रीय कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल व कुमार सोहम समीर किल्लेकर याने कलाध्यापक संघाने राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ऋतुरंग स्पर्धेत विशेष कलाकृती सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते पालकांसमवेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्रक व बुके देऊन व पाल्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकांचाही बुके देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.आपल्या अध्यक्षीय मनोगतात सज्जाद भाई सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांना धन्यवाद दिले व सत्कार मूर्ती गुणवंताना शुभेच्छा देताना भविष्य काळाचा वेध घेऊन स्वतः ला अप करण्याचा सतत प्रयत्न कण्याचे व अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता, जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन करून शाळेच्या ज्या ज्या उणीवा दिसतील त्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात असेही विद्यार्थी व पालकाना सूचित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नितीन जाधव व रमेश गंधेरे, आभार शिक्षक श्री. संतोष चव्हाण सरानी मानले, बुके निर्मिती-शिक्षिका नसिम शेकासन मॅडम सोबत प्रशालेच्या विद्यार्थिनी, शाळेच्या उपक्रमांची ppt निर्मिती- लिपिक शोझब सर, ईशस्तवन व स्वागतगीत -संज्योत खेडेकर मॅडम व विद्यार्थी चमू फोटोग्राफी न्यू इंग्लिश स्कूल, पडवे ता. गुहागरचे लिपिक श्री. राहुल कांबळेसर, शिक्षेत्तर कर्मचारी श्री. रविंद्र लवंदे, फैय्याज भाटकर व स्वयंपाकी सौ. सुवर्णा राजेंद्र बैकर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.