(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवारी) संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले.
सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ दुचाकी आणि मोठ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चिपळूण तालुक्यातील पिपंली येथील विलास महादेव चव्हाण (वय 43) यांचा दुचाकीवरील प्रवास अत्यंत गंभीर अपघातात बदलला. अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या चक्क्याखाली येऊन त्यांचा पाय गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टर मोरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले.
तसेच आज, संगमेश्वर पोलीस ठाण्यापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर पुनर्वसन येथे एक दुसरी अपघाताची घटना घडली. यात MH05FV2736 सकार्पिओ आणि MH11AL0832 आयषर ट्रकचा अपघात झाला. या अपघातात स्कार्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर आयषर गाडीवर किरकोळ नुकसान झाले. या अपघातात स्कार्पिओ चालक भीमराव मरिअपा चालवादी आणि आयषर ट्रक चालक मयूर हनुमंत चंदनशिवे होते.
या दोन्ही घटनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी सांगितले की, सकार्पिओ आणि आयषर अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर दुचाकी आणि चारचाकीची नोंद प्रक्रिया चालू आहे.

संगमेश्वरमध्ये दुचाकी अपघाताची दुःखद घटना सर्वांनाच हेलावून टाकणारी होती, अपघातात जखमी झालेल्या विलास महादेव चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे आणि रक्तबंबाल अवस्थेत विव्हळत असल्याचे पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे, आणि या प्रकरणात पुढील तपास चालू आहे.

