(रत्नागिरी)
इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. इस्लामी कालगणनेनुसार हा दिवस रबी उल अव्वल महिन्याच्या १२ व्या दिवशी येतो.
याच औचित्याने दावते इस्लामी रत्नागिरी तर्फे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी कोकण नगर ते चर्मालय परिसरात लहान मुलांची रॅली उत्साहात काढण्यात आली. रॅलीत सहभागी मुलांनी पैगंबरांच्या संदेशाचे स्मरण करून ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला.
या कार्यक्रमास दावते इस्लामी संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ कुरेशी, सदस्य उवेस जरीवाला, अकिल मेमन तसेच गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी अध्यक्ष फारुक जरीवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

