(गणपतीपुळे / वैभव पवार)
बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी आणि बारावी तसेच अन्य कोणत्याही शाखांमधील पदवीका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (जुने वस्तीगृह )नरहर वसाहत शिवाजीनगर रत्नागिरी येथे सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आ.रा.स. अकॅडमी ॲकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करियर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शिक्षण अकॅडेमीचे संस्थापक आणि संचालक ॲड. राकेश सत्वे सर हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि समाजातील बंदुभगिनिनी उपस्थित राहवे, असे आवाहन बुदिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ रत्नागिरीचे अध्यक्ष बी. के. कुरतडकर आणि चिटणीस शरद कांबळे यांनी केले आहे.

