(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड साखरी बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ च्या वतीने रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी वर्षावास या धार्मिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रमांतर्गत धम्मप्रवचन मालिका मागील आषाढ पौर्णिमेपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील विविध गाव शाखांमध्ये या मालिके अंतर्गत वर्षावास कार्यक्रम घेण्यात आले. त्यातील जयगड साखरी बौद्धवाडी येथील सामग्गी बुद्ध विहारात हा कार्यक्रम रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत जयगड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे चिटणीस तथा ज्येष्ठ बौद्धाचार्य रविकांत पवार यांचे विशेष धम्म प्रवचन होणार आहे.यावेळी जयगड शाखेचे प्रमुख पदाधिकारी व सामग्गी महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार व त्यांचे सर्व सहकारी, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच संस्कार समितीचे सर्व श्रामणेर व बौद्धाचार्य आणि गाव शाखांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, चिटणीस रविकांत पवार व जयगड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

