(राजापूर)
राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची कन्या अपूर्वाताई किरण सामंत यांनी नुकतीच रायपाटण परिसरातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. रायफल येथील शिवसेनेचे राजापूर तालुक्यातील उमदे नेतृत्व व माजी उपसभापती उमेश केशव पराडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन अपूर्वाताई किरण सामंत यांनी घेतले.
उमेश पराडकर यांचे मोठे बंधू शैलेश पराडकर यांनी अपूर्वा ताईंचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी रायपाटण परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

