( रत्नागिरी / वैभव पवार)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी रत्नागिरी तालुका व शहर कार्यकारणीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यासंदर्भात अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून, त्यावरील हरकतींची मांडणी तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांसाठी गण/प्रभागनिहाय आढावा बैठकींचे नियोजन या बैठकीत करण्यात आले होते.
बैठकीस शिवसेना नेते सचिव व माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, प्रकाश जाधव, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड यांच्यासह तालुका व शहरातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख उपस्थित होते.

