(चिपळूण)
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, कोयना प्रकल्प, चौथा टप्पा, पोफळी मधील आदर्श कर्मचारी, शिरवाग-पोफळी विभागातील सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्र. २८, मुक्काम गाव तिवरे (चिपळूण) शाखेचे सभासद सुभाष रामचंद्र गायकवाड यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या ५३ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
दिवंगत सुभाष रामचंद्र गायकवाड हे सोज्वळ मनाचे, हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे समाजसेवक होते. चिपळूण तालुका हितसंरक्षक समिती गटक्रमांक २ तिसगाव विभाग, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला सुभाष गायकवाड यांचे ते पती होते. त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, भावजय आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत सुभाष रामचंद्र गायकवाड यांचा जलदानविधी व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता एम.ई.सी.बी. कॉलनी, पोफळी येथे चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्र. २८ तिवरे या शाखेच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला आहे. तरी विभागातील सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी, विविध आंबेडकरी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्र. २८ तिवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

