(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांना लोकसत्ता संघर्ष यांच्या वतीने बेस्टसीयईव अर्थविश्व पुरस्कार हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना याबाबतचे निवडपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना, संचालक मंडळाच्या सहकार्याने राबवतानाच, बँकेची यशस्वी वाटचाल करण्यामध्ये अजय चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल लोकसत्ता संघर्ष या संस्थेने घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
मागील अनेक वर्ष सातत्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदावर त्यांनी काम केले असून रत्नागिरी जिल्हा बँकेला सर्वोत्कृष्ट करण्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान लक्षणीय आहे. आपल्या कार्याप्रति अत्यंत प्रामाणिकपणे काम करतानाच, बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे सर, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने लोकांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी बँकेच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखामधून यशस्वीपणे राबविण्यात पुढाकार घेतला आहे.म्हणूनच त्यांच्या कार्याची अतिशय सकारात्मक चर्चा सहकार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.
उत्कृष्ट प्रशासक, अत्यंत संवेदनशील संवादक, सहकार क्षेत्रातील अभ्यासू आणि अत्यंत नम्र स्वभाव यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे सर, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या सर्वच संचालक मंडळाने त्यांच्या अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजय चव्हाण यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.