(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे झालेल्या १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व तायक्वॉंदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो अँड फिटनेस अकॅडमी, लांजा येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक विजेते
स्वर्णिम श्रेयश शेट्ये, तेजस्वी दशरथ लाड, भक्ती भागवत कुंभार
रौप्यपदक विजेते
अन्वी सचिन पवार, आराध्य कमलाकर सावंत
कास्यपदक विजेते
प्रिया प्रमोद लांजेकर, राजवर्धन रणजीत माने, आर्या कृष्णा आग्रे, आदिश्री अभय शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे
याशिवाय आर्या ओंकार देसाई, विघ्नेश विनोद दिवाळे, तनया संदीप पाटकर, वैष्णवी विजय मंचेकर, निधी रवींद्र लिंगायत, वृत्ती रंजन पावसकर, आराध्या कृष्णा आग्रे, आर्या सचिन पवार, रोहन चंद्रकांत साबळे, आदी रंजन पावसकर, प्रशांतसिंग विजयसिंग चव्हाण आणि सागर संतोष चौगुले यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धांसाठी राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंचप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर यांच्यासह शितल विरेंद्र आचरेकर आणि गणेश ईश्वर तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, मार्गदर्शक तेजस वडवलकर आणि पालकवर्गाने अभिनंदन केले.

