(खेड)
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सवेणी नं.१ येथील इयत्ता ७ वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावून तसेच नासा/इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या कु. यशस्वी प्रदीप चव्हाण हिचा स्वप्निल शांताराम गुजर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कारासाठी ५,००० रुपयांचा क्रॉस चेक कै. कृष्णाबाई रामचंद्र गुजर यांच्या स्मरणार्थ देण्यात आला. या कार्यासाठी स्वप्निल गुजर यांना त्यांचे चुलते श्री. दशरथ गुजर यांची प्रेरणा लाभली. मुंबईत कार्यरत असलेले स्वप्निल गुजर यांनी हा चेक गावातील श्री. सुरेश गुजर यांच्या मार्फत शाळेत पाठवला. शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ. रश्मी रमेश गुजर व माजी अध्यक्ष युवराज गुजर यांच्या हस्ते तो यशस्वीला सुपूर्द करण्यात आला.
स्वप्निल गुजर यांनी शाळेतील मुलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून, यापुढेही प्रत्येक वर्षी अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनःपूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. गोपाळ जाधव यांनी आभार मानले. माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. युवराज गुजर यांनी मुलांना नव्या दिशेने प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमासाठी स्वप्निल गुजर यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाला पोलीस पाटील रोशन पवार, ग्रामस्थ अनिल कदम, अंगणवाडी सेविका मोरे मॅडम, पालक नागेश पवार, विचारें, शिंदे, नेहा गांगरकर, सचिन गांगरकर, सुचिता राणे, चिनकटे मॅडम तसेच शिक्षक गणोजी माने, स्मिता शिंदे मॅडम, अजय म्हादे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एकनाथ पाटील सर यांनी केले.

