( खेड )
खेड तालुक्यातील सुसेरी येथे कौटुंबिक वादातून वडिलांवर ऍसिड टाकून त्यांना जखमी करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुसेरी नं. २ खालची वाडी येथे घडली. मुलाचे नाव मंगेश अनिल देवळेकर (वय २३) असे असून, जखमी वडिलांचे नाव अनिल हिरू देवळेकर आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद पाच दिवसांनी, म्हणजे १० मे रोजी करण्यात आली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, घरात असताना मंगेश याने शिवीगाळ करून आपल्या वडिलांवर व चेहऱ्यावर ऍसिड फेकले. यामध्ये त्यांच्या डोळ्यांना, ओठांना आणि पाठिला इजा झाली. घटनेनंतर अनिल देवळेकर यांनी तातडीने उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी १० मे २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात जाऊन आपला मुलगा मंगेश देवळेकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मंगेश देवळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२४(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पुढील तपास सुरू आहे.