(चिपळूण)
खेड तालुक्यातील साखर गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान, पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा असलेली आदीमाया आदीशक्ती श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी गुरूवार दि. १७ एप्रिल २०२५ रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला.
या प्रसंगी देवीच्या परंपरेनूसार लाटेची विधीवत पुजा करून त्यानंतर देवीची लाट ढोल ताशांच्या गजरात खरखांबावर चढविण्यात आली. श्री कालिका मातेच्या यात्रेसाठी निमंत्रित गावातील दैवतं श्री देव केदारनाथ गाव निवे,श्री झोलाई देवी गाव तलवट जावळी,श्री झोलाई देवी गाव मुसाड,श्री देव काल भैरव गाव तलवट पाल, श्री वाघजाई देवी गाव कुंभवली,श्री कालिका देवी गाव कावळे,श्री मानाई देवी गाव कुरवल जावळी, श्री रामवर्दायनी देवी गाव चोरवणे उतेकरवाडी या गावातील नऊ दैवतांच्या पालख्यांचे समवेत ढोल ताशांच्या गजरात, सनईच्या मंगळ सुरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालख्या नाचवत मंदीराच्या सभोवती दोन प्रदक्षिणा घालून मनमोहक, नयनरम्य छबिना काढण्यात आला. आणि हा छबिना सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, गुहागर या तालूक्यांतील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चैत्र कृष्ण पंचमी शुक्रवार दि.१८ एप्रिल २०२५ रोजी,गावातील चौकीचीवाडी,जांभूळवाडी आणि बामणवाडी या तिन वाडीतील मानकरी यांचे शुभहस्ते देवीचा समा भरण्यात आला.आणि गावचे ग्रामदैवत श्री कालिकामाता आणि श्री झोलाई माता तलवट जावळी यांचे मध्ये एक चौक भरून त्याचे माणकर्यांकडून पुजन करण्यात आले.आणि झोलाई माता देवीची खणानारळाने ओटी भरून ओटीचा प्रथम मान देण्यात आला.त्या नंतर सर्व निमंत्रित दैवतांना ओटीचा मान देण्यात आला.
तसेच गळ लावण्याची परंपरे नुसार मानकऱ्यांकडून गळाची पुजा करून गळ लाटेला लावून खरखांबा सभोवताली प्रदक्षिण घेण्यात आले. सर्व दैवतांच्या पालख्या पाठवणीसाठी एक-एक करून मंदीरातून बाहेर काढून ढोल ताशांच्या गजरात सन्मानाने सोडण्यात आले. या दोन दिवसाच्या यात्रौत्सवासाची सांगता करण्यात आली.
हा यात्रौत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त साखर गाव ग्रामस्थ कमिटी आणि ग्रामीण,मुंबई पुणे ग्रामस्थ मंडळीं यांनी उत्तम नियोजन केले होते. व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली तरूण पिढीची प्रामाणिक धडपड उल्लेखनीय होती. तसेच सहभागी भाविक भक्तजन यांच्या अतुलनीय मोलाच्या सहकार्याबद्दल साखर गाव ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष संतोष कृष्णा उतेकर यांनी गावच्यावतीने सर्वांना धन्यवाद दिले. व पुढील वर्षीही असाच सहभाग आणि उत्साह मिळावा असे आवाहन केले आणि सर्व उपस्थितांचे गावातर्फे आभार मानले.