( रत्नागिरी )
नुकत्याच झालेल्या क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा तालुका क्रीडा अधिकारी सचिन मांडवकर जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, सचिव लक्ष्मण कररा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक धाडसी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी 14 वर्ष व 17 वर्ष व 19 वर्ष वयोगटातील मुलगे व मुली यांची स्पर्धा डेरवण क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.
सदर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शहरातील एम. एस. नाईक हायस्कूल मधील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला कु. अनफाल नाईक याने १७ वर्षा खालील 38 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या भरीव कामगिरीमध्ये त्याने चिकाटी जिद्द व प्रयत्न यांच्या जोरावर यश प्राप्त केले आहे. यामुळे शाळेचे नाव उंचावले.
या यशामागे शाहरुख शेख राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक एस.आर.के.तायक्वांदो क्लब रत्नागिरी चे अध्यक्ष यांचे बहूमूल्य असे मार्गदर्शन तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक अनिकेत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन नौमान नाईक सह CEO अकीब काझी, शाळेचे मुख्याध्यापक अशफाक नाईक, पर्यवेक्षक मनोज चवेकर तसेच सर्व शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे. तसेच विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी अनफाल नाईक याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.