(मुंबई)
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (कर्णधार) सोपविण्यात आली असून, शुभमन गिल उपकर्णधार म्हणून कार्यभार सांभाळणार आहे.
यंदाच्या आशिया चषकात एकूण १९ सामने होणार असून, सर्व सामने २० षटकांचे (T20) स्वरूपाचे असतील. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे. भारताचा समावेश गट अ मध्ये करण्यात आला असून, या गटात पाकिस्तान, ओमान आणि युएई यांचाही समावेश आहे.
मूळतः भारतीय संघाची घोषणा दुपारी १:३० वाजता होणार होती. मात्र, मुंबईतील जोरदार पावसामुळे निवड समितीची बैठक उशिरा सुरू झाली आणि अखेर दुपारी २:३० वाजता संघ जाहीर करण्यात आला.
स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल, तर २८ सप्टेंबरला अंतिम सामना खेळविला जाईल. ८ संघांना प्रत्येकी ४ संघांच्या दोन गटांत विभागण्यात आले आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-४ फेरीत प्रवेश करतील. सुपर-४ मधील आघाडीचे दोन संघ अंतिम सामन्यास पात्र ठरतील.
आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) हार्दिक पांड्या, रिंकुसिंग, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, आणि अर्शदिपसिंग
राखीव खेळाडू :
यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.
आशिया कप 2025 – वेळापत्रक (ग्रुप स्टेज)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

