या हंगामात एकूण १७ सामने शिल्लक आहेत हे उल्लेखनीय आहे. ज्यामध्ये चार प्लेऑफ सामने देखील समाविष्ट आहेत. या दरम्यान, आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळला जाईल तर दुसरा एलिमिनेटर सामना ३० मे रोजी खेळला जाईल. तर, दुसरा क्वालिफायर १ जून रोजी खेळवला जाईल. त्यानंतर अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल.
प्ले-ऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक :
- क्वालिफायर १: २९ मे २०२५, हैदराबाद
- एलिमिनेटर: ३० मे २०२५, हैदराबाद
- क्वालिफायर २: १ जून २०२५, कोलकाता
- अंतिम सामना: ३ जून २०२५, कोलकाता (किंवा अहमदाबाद, हवामानानुसार)
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५८ सामने खेळले गेले असून, १२ साखळी सामने बाकी आहेत. गुणतालिकेत गुजरात टायटन्स (१६ गुण, +०.७९३ एनआरआर) अव्वल स्थानी आहे, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (१६ गुण, +०.४८२ एनआरआर), पंजाब किंग्स (१५ गुण), मुंबई इंडियन्स (१४ गुण), दिल्ली कॅपिटल्स (१३ गुण), कोलकाता नाइट रायडर्स (११ गुण) आणि लखनऊ सुपर जायंट्स (१० गुण) यांचा क्रमांक लागतो. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांना प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे.

