(दापोली)
तालुक्यातील मौजे फुरुस, सुखदर फाटा येथील मोरीवर १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता अपघात घडला आहे. अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) हे त्यांच्या मारुती सुझुकी स्वीफ्ट डीझायर (सफेद, क्र. एम.एच.१७ बी.व्ही. ५७८९) घेऊन मुंबईहून दापोलीकडे जात होते, त्यावेळी समोरून उतारावरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या मॅजिक गाडी (क्र. एम.एच.०८ झेड २२९८) ने स्वीफ्टला चुकीच्या बाजूने ठोकर दिली.
या धडकेमुळे अनिकेत भंडारी यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तर त्यांना दुखापतही झाली आहे. अपघाताच्या घटनेनंतर फिर्यादींनी तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गु.र.नं. २५९/२०२५ नोंदवण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी सागर आनंद नलावडे (रा. महात्मा फुले नगर, खेड) विरोधात कारवाई सुरू आहे.

